कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन, पोलिस उपनिरीक्षकाची चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश
*काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांनी दिले आदेश* *प्रतिनिधी : महानगरपालिकेवर शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नां संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाच्या वेळी काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करणाऱ्या तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आदेश दिले आहेत.*


ना. पाटील यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना याबाबत लेखी आदेश दिले असून एक महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी, त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नगरकर जनतेच्यावतीने भव्य आसूड मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात आला होता. 


यावेळी आयुक्तांच्या दालनामध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी काळे यांच्यासह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी गेल्या होत्या. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आयुक्तांना भेटू दिले नाही असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला होता. त्याच बरोबर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोळंकेंच्या वर करण्यात आला होता. आंदोलनस्थळी सोळंके यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकी दिल्याचे म्हटले होते. काल रात्री उशिरा काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. यामध्ये स्वतः सोळंके हे फिर्यादी आहेत. 


घडलेल्या घटनेबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलीस महासंचालकांना उपनिरीक्षक सोळंके यांची तात्काळ चौकशी करण्याचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत  या संदर्भामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी ना. पाटील यांची मुंबईत भेट घेत निवेदन दिले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील उपस्थित होते. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post