शरद पवार यांना राष्ट्रपती करण्याच्या हालचाली... स्वतः पवारांनी केला मोठा खुलासा

 


शरद पवारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली... स्वतः पवारांनी केला खुलासामुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी यूपीएमध्ये हालचाली सुरू असल्याचं वृत्त होतं.  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबतची मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. हे वृत्त निराधार आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. प्रशांत किशोर यांनी माझ्याशी माझ्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत चर्चा केल्याचं वृत्त निराधार आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी काय गणित मांडलंय हे मला माहीत नाही. प्रशांत किशोर यांनी माझी भेट घेतली. मात्र, ही राजकीय भेट नव्हती. 2024च्या निवडणुकीवर या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post