करोनाचा वाढता प्रादुर्भाव...'या' तालुक्यातील ७७ गावात कडक निर्बंध

पारनेर तालुक्यातील ७७ गावात कडक निर्बंध नगर: मागील १५ दिवसांपासून पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे आता तालुक्यातील ७७ गावे कोरोना संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून, त्या गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कडक निर्बंध लादण्यात आलेल्या तालुक्यातील ७७ गावांतील सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असा आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिला आहे. तसेच, कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना या गावांतील कोरोना समितीने करायच्या आहेत. बाहेरगावांहून आलेल्या पाहुण्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, बाधित रुग्णांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत त्यांना घरी विलगीकरण कक्षात ठेवता येणार नसल्याचाही आदेश कोरोना समितीस दिला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post