शासकीय अधिकारी झाला आणि लगेच लाच प्रकरणात 'एसीबी'च्या जाळ्यात अडकला

  शासकीय अधिकारी झाला आणि लगेच लाच प्रकरणात 'एसीबी'च्या जाळ्यात अडकलाउस्मानाबाद : अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचे 5 लाख 64 हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी नारायण दशरथ गायके याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

बिल काढण्यासाठी चक्क प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे गायके यांना लाच स्वीकारण्याचा मोह रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा आवरता आला नाही.

गायके हे गेल्याच वर्षी शासकीय सेवेत रुजू झाले असून त्याचे वय 32 वर्ष आहे. तरुण व नव्याने सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच घेण्याचा मोह जडल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post