शिवसेनेच्या संपर्क अभियानात ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌राडा, आजी माजी आमदार समर्थक भिडले


शिवसेनेच्या संपर्क अभियानात ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌राडा, आजी माजी आमदार समर्थक भिडले उस्मानाबाद : शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर फोटो न लावल्याने उस्मानाबादेत शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागात शिवसैनिक आपआपसात भिडले. या राड्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. या फोटो न लावल्याने हा वाद झाला. या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात तब्बल 25 जणांनी लाठ्या, काठ्या, बाटल्या घेऊन हा हल्ला केल्याचे बोललं जात आहे. या राड्यात शिवसेनेचे परंडा तालुकाप्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post