ऑनलाईन शॉपिंग भोवली...५०० रूपयांच्या थर्माससाठी ५ लाख गमावले

 ऑनलाईन शॉपिंग भोवली...५०० रूपयांच्या थर्मास पडला ५ लाखांनानागपूर : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. नागपुरातील एका व्यक्तीला 500 रुपयांची शॉपिंग तब्बल 5 लाखांना पडली. गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर संपर्क केलेल्या ग्राहकाची फसवणूक झाली.

मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटने ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन पाचशे रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त किमतीला पडला. विकत घेतलेला थर्मास पसंतीस न पडल्याने विज्ञान मेश्राम यांनी तो परत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गुगलवरुन त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क केला. मात्र ते ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आले.

टोळीने विज्ञान मेश्राम यांना एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. या संदर्भात विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post