'या' तालुक्यात मुंडे समर्थकांचे सामूहिक राजीनामे

 

नेवासा तालुक्यात मुंडे समर्थकांचे सामूहिक राजीनामेनेवासा: खासदार डॉ. प्रितमताई मुंडे  यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे नेवासा तालुक्यातील 51 भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती लोकनेते गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठाणचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांनी दिली.


राजीनामा पत्रात श्री.किर्तने यांनी म्हटले की, लोकनेते गोपिनाथ मुंढे प्रतिष्ठाण भानसहिवरा  यांच्या 51 सदस्यांचा भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आपल्याकडे देण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या रणरागिणी बहुजन समाजाच्या लोकनेत्या पंकजा गोपिनाथ मुंडे व कर्तव्यदक्ष खासदार डॉ. प्रितमताई मुंडे  यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यामुळे  आम्ही व सर्वसामान्य जनता नाराज झाली आहे. स्व.लोकनेते मुंडे साहेबांनी पक्षाला अहोरात्र कष्ट करुन बहुजनांचा पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली.


त्यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी पुढे पक्षाचा वारसा खंबीरपणे पुढे चालवला तरी पक्षातील काही लोक त्यांच्यावर अन्याय करत असून तो अन्याय आम्हाला सहन न झाल्यामुळे आम्ही सर्व एक्कावन्न सदस्य भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत तरी आपण लवकरात लवकर राजीनामा मंजूर करावा असेही राजेंद्र किर्तने, सुनिल आव्हाड, बाबासाहेब गोल्हार, रावसाहेब घुले, राजेंद्र दराडे, सुयोग सांगळे, मंगेश वनवे आदींनी पत्रात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post