जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली, मनीषा खत्री नव्या जिल्हाधिकारी

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली, मनीषा खत्री नव्या जिल्हाधिकारीनंदुरबार: येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली असून त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.2013 च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी असलेले डॉ. भारुड हे गेल्या दोन वर्षापासून नंदुरबार जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.

त्यांची पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचा अतिरिक्त आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्रीमती खत्री या 2014 च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. लवकरच त्या आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post