अधिकाऱ्यांची मनमानी, सरपंचाने जिल्हा परिषदेच्या आवारातच फायली जाळल्या

 अधिकाऱ्यांची मनमानी, सरपंचाने जिल्हा परिषदेच्या आवारातच फायली जाळल्यानांदेड : जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील सरपंचाने जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला जिल्ह्यातील सरपंच वैतागून गेलेय. किनवटच्या घोटीमधल्या सरपंचांना राग अनावर होऊन त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातच अधिकाऱ्यांसमोर फाईल जाळल्या. 

पाणीपुरवठा विभागाच्या कामांना गती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी या सरपंचांनी फाईलची होळी करत आपला संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी या सरपंचाने केलीय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post