अंगावर शहारे आणणारी घटना...नणंदेने वहिनीला जिवंत जाळले

 आपल्या मुलीचा लाड होणार नाही...नणंदेने वहिनीला जिवंत जाळलेयवतमाळ : अंगावर तेल फेकून विवाहितेची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना यवतमाळमध्ये समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे महिलेच्या नणंदेनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. भावालाही मुलगी झाल्यामुळे आता माहेरी आपल्या लेकीचे लाड कोण करणार? या असूयेच्या भावनेने नणंदेने वहिनीला जाळल्याचा आरोप केला जात आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील दातपडी गावात ही घटना घडली. विवाहितेच्या अंगावर तेल टाकून तिला जाळून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. मोनिका गणेश पवार असे मयत महिलेचे नाव आहे. मोनिकाच्या नणंदेनेच तिची हत्या केली.

पहिल्या मुलानंतर गणेश पवारला मुलगी झाली, मात्र भावाला मुलगी झाल्याने, माहेरी आता आपल्या मुलीचे लाड होणार नाहीत, या कारणामुळे आरोपी नणंद कांता संजय राठोड चरफडत होती. त्यामुळेच तिने तेल टाकून वहिनीला जाळून मारले, अशी तक्रार महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. पांढरकवडा पोलिसांनी नणंद कांता राठोड हिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post