नगर-बीड महामार्ग लवकरच चौपदरी, आ.सुरेश धस यांचा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा

 


नगर-बीड महामार्ग लवकरच चौपदरी, आ.सुरेश धस यांचा केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावानागपूर :  नागपूर येथे आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय रस्ते विकास,वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या बीड ते अहमदनगर एकूण किलोमीटर १४०.७७५ लांबी असलेल्या आणि १ हजार ५० कोटी किंमतीच्या मार्गावरील चार टप्प्यातील कामांना तात्काळ मंजुरी देण्यात येऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली.हा मार्ग चौपदरी दर्जाचा होणार आहे. तसेच प्रमुख शहराच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोड  देखील करण्यात येणार आहेत.  याबाबत सकारात्मक चर्चा होऊन लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असे ना.गडकरी  यांनी आश्वासन दिले.

यावेळी ना.गडकरी व आ.सुरेश आण्णा धस यांच्यात जवळपास अर्धा तास याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी बीड जि. प.माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,जि. प.सदस्य माऊली जरांगे, प्रकाश कवठेकर,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,पाटोदा नगराध्यक्ष बळीराम पोटे,माजी सभापती अंकुश चव्हाण,सरपंच अनिल ढोबळे, संदीप खकाळ,नगरसेवक संतोष मुरकुटे,असिफ सौदागर,दीपक तांबे,अशोक सुपेकर,सरपंच सुधीर पठाडे,अनिल काथखडे,सरपंच राम धुमाळ,उपसरपंच सागर धोंडे, किरण शिंदे, अभय पवार,ज्ञानेश्वर मुरकुटे,शरद देसाई,अजय गुंड,अविनाश विधाते ,आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post