प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाहीच.... पंकजा मुंडे म्हणाल्या....

 प्रितम मुंडे यांना मंत्रीपद नाहीच.... पंकजा मुंडे म्हणाल्या....मुंबई: अगदी कालपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र,  पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील काही अनपेक्षित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. 


या पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करुन हा संभ्रम दूर केला आहे. खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पहिली ती चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे काही राजकीय पडसाद उमटणार का, हे आता पहावे लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post