तूर्तास स्वल्पविराम, शक्य होईल तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करेन


मी शक्य होईल तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करेन, पंकजा मुंडे यांचा सूचक इशारा मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.

आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा निरादार करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post