महिलेचे हॉटेल जेसीबी लावून पाडले.. भाजपच्या दिग्गज आमदारावर गुन्हा दाखल

 महिलेचे हॉटेल जेसीबी लावून पाडले...आ.सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखलबीड : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून आमदार सुरेश धस आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या हॉटेलची जेसीबीने तोडफोड केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मनोज चौधरी असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी ह्या निवडणूक  रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांचे  समर्थक पती मनोज चौधरी यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post