जखमी कार्यकर्त्यांला भेटण्यासाठी आमदारानी केला बैलगाडीतून प्रवास

 कार्यकर्त्यांला भेटण्यासाठी आ.सुरेश धस बैलगाडीतून गेले


बीड: मागच्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील कोळेवाडी येथील संभाजी नेटके यांना शेतात काम करत असताना लाईटचा शॉक लागला होता.त्यात ते जखमी झाले होते. पावसाचे दिवस असल्याने वस्तीवर मोटारगाडी जात नव्हती. म्हणून आ.सुरेश धस यांनी बैलगाडीचा आश्रय घेऊन संभाजी या कार्यकर्त्यांची घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.यावेळी कृष्णा पांनसबळ, कल्याण तांबे आदी उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post