राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रायफलने साधला निशाणा..

 राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले रायफल शूटिंग
नगर:  राहुरी येथील वॉरियर तायक्वांदो अँड रायफल शुटिंग अकॅडमी यांच्या तायक्वांदो प्रमोशन बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना  राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते बेल्ट आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.  यावेळी तनपुरे यांनी रायफल शूटिंगचाही आनंद घेतला.

या स्पर्धेत सहभागी झालेली  मुलगी आरोही हिला सुद्धा तनपुरे यांनी येलो बेल्ट प्रदान केला. 

हल्ली कामाच्या व्यापात मुलांना वेळ देणं, त्यांच्या छोट्या-मोठ्या यशात सहभागी होणं जमतच असं नाही. पण आपल्या मुलांसाठी कधीतरी खास वेळ काढावा, त्यांच्यात रमावं म्हणजे मन हलकं होतं, अशा भावना राज्य मंत्री तनपुरे यांनी व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post