नगर शहरात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्यावी, आ.संग्राम जगताप यांची मागणी

 नगर शहरात शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता द्यावी, आ.संग्राम जगताप यांची मागणीनगर: अहमदनगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणेबाबत  आ.संग्राम जगताप यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याबाबत त्यांनी   महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे.

अहमदनगर शहर हे अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून अहमदनगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर जिल्ह्यात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. परंतु त्या ठिकाणी राहण्याचा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसतात. त्यामुळे अहमदनगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे बाबत अमित देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे, असे आ.जगताप यांनी सांगितले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post