साखरपुडा, लग्न समारंभावेळी सरसकट करोना चाचणी...४३ बाधित सापडले

पारनेर तालुक्यात साखरपुडा, लग्न समारंभावेळी करोना चाचणी...४३ बाधित सापडलेनगर:  पारनेर तालुक्यातील करोना संसर्गाला आळा बसण्यासाठी प्रशासनाने लग्न समारंभ आणि त्या ठिकाणी होणार्‍या गर्दीवर लक्ष केंद्रीत केले. रविवारी तालुक्यात 13 ठिकाणी लग्न समारंभ, साखरपुडा या ठिकाणी जमलेल्या 3 हजार 600 लोकांची करोना चाचणी  केल्यानंतर त्यात 43 करोना बाधित आढळले आहे. अशा प्रकार सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींची करोना चाचणीचा पहिला प्रयोग जिल्ह्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी यशस्वीपणे राबविला.


पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार रविवारी पारनेर तालुक्यात महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने लग्न समारंभ, विवाह साखरपुडा कार्यक्रमाला हजर असलेल्याची सामुहिक करोना चाचणी  करून घेतली. तालुक्यात करोनाची दुसरी लाट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसंदिवस करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post