महिला डॉक्टरच्या रूममध्ये छुपा कॅमेरा...एम.डी. डॉक्टर अटकेत

 महिला डॉक्टरच्या रूममध्ये छुपा कॅमेरा...एम.डी. डॉक्टर अटकेतपुणे : डॉक्टर महिलेच्या रूममध्ये छुपे कॅमेऱ्या लावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बड्या डॉक्टरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुजित जगताप असं या आरोपी डॉक्टरचं नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये त्याने स्पाय कॅमेऱ्या लावल्याचा आरोप आहे. 42 वर्षीय सुजित जगताप हा एम.डी. आहे.


त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आल्याने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टरला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठाडी सुनावली आहे. डॉक्टर सुजितने छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं तपासात समोर आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post