अभूतपूर्व घटना...भाजपने विधानसभेच्या पायऱ्यांवर भरवली प्रतीविधानसभा...

विधिमंडळाच्या प्रांगणात अभूतपूर्व घटना...भाजपने विधानसभेच्या पायऱ्यांवर भरवली प्रतीविधानसभा... मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी  विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याने भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजपाने आज विधानसभा सभागृहात न जाता पायऱ्यांवरच प्रतिविधानसभा भरविली आहे. या प्रतिविधानसभेचे कालीदास कोळंबकर अध्यक्ष आहेत. दुसरीकडे विधानसभेत कामकाज सुरु आहे. या महाराष्ट्रात सरकारकडून अन्याय सुरु आहे. शेतकरी, विद्यार्थी, एमपीएससीचे प्रश्न असतील या प्रश्नांवर आवाज उठविला तर अध्यक्ष महोदय खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केले जात आहे. खूर्चीवर बसून जे घडलेच नाही ते आरोप केले जात आहे. यामुळे मी आज या प्रतिसभागृहात मी प्रस्ताव मांडत आहे. यावर चर्चा सुरु करावी, आणि सरकारचा जो काही कारभार सुरु आहे, त्या जुलमी सरकार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात पर्दाफाश करायचा आहे. ज्या सदस्यांनी तुम्हाला नावे दिली आहेत, त्या सदस्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी प्रति विधानसभेचे अध्यक्ष कोळंबकर यांच्याकडे केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post