दुकानांची वेळ सायं. ७ पर्यंत करून विकेंड लॉकडाऊन रद्द करावा, नगरमधील व्यापार्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 दुकानांची वेळ सायं. ७ पर्यंत करून विकेंड लॉकडाऊन रद्द करावा, नगरमधील व्यापार्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 महाराष्ट्रात तसेच नगर जिल्ह्यात दुकांनांची वेळ सकाळी ७ दुपारी ४ ऐवजी सकाळी १० ते सायंकाळी ७ अशी करावी तसेच शनिवार, रविवारचा कडक लॉकडाऊन रद्द करण्यात यावा अशी मागणी एम.जी. रोड अहमदनगर स्थित किरकोळ दुकानांच्या मालकांची नोंदणीकृत संघटना व सराफ सुवर्णकार संघटनांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

निवेदनातील प्रमुख मुद्दे....

१) वेळ व्यवस्थापन - 

सकाळी ७ते संध्याकाळी ४ही वेळ  ग्राहकांना आणि दुकानदारांना गैर-व्यावहारिक आणि गैरसोयीचे वाटते. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ किंवा सकाळी १० ते ७ पर्यंत  ही वेळ करण्यात यावी कारण ग्राहक हे सकाळी १० वाजे नंतर  येतात. तसेच  कामकाजाचे  तास वाढविल्यास शेवटी गर्दी होणार नाही. आपण संध्याकाळी ७ वाजता दुकान बंद करण्याची वेळ दिली तर  तर बहुतेक दुकानदार विदेशी देशांप्रमाणे हे धोरण   कायम स्वरूपी अमलात आणतील. 


२) अनावश्यक दुकाने - सर्व सिझन संपल्यामुळे दुकानात कोठे ही गर्दी नाही  त्या मुळे कोरोना अनावश्यक दुकानांमुळे पसरतो असे नाही.


3)संशोधन - तिसरी लाट कधी येईल याचा अंदाज  टास्क फोर्स किंवा  कोणालाही सांगता येणार नाही. प्रत्यक्षात जेव्हा तिसरी लाट येईल तेव्हा लॉकडाउन लादणे फारच अवघड होइल . आता  कोविड रूग्ण संख्या  नियंत्रणाखाली आहेत तेव्हा आपण  व्यवसायाचे मौल्यवान  कालावधी वाया घालवित आहोत.


4) शनिवार व रविवार लॉकडाउन- शनिवार व रविवार लॉकडाऊन दरम्यान लोक घरात राहत नाहीत. पूर्वी सर्व रुग्णालये भरली होती आता आठवड्याच्या शेवटी सर्व हिल स्टेशन आणि पिकनिक स्पॉट्स फुल आहेत. दुकाने बंद असताना  कर्मचारी शहरात फिरतात आणि दुकाने बंद असूनही रस्त्यावर गर्दी असते म्हणून शनिवार व रविवार लॉकडाउनचा उपयोग होत नाही. म्हणूनच, हे अयोग्य  अव्यावहारिक आहे तरी  शनिवार व रविवारचे  लॉकडाउन त्वरित रद्द करावे.


5) महानगरपालिका क्षेत्र- जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागांच्या तुलनेत शहर भागात रुग्ण संख्या कमी आहे. म्हणून, लोकसंख्येची कोणतीही अट न घालता उर्वरित जिल्ह्यापासून शहर भाग स्वतंत्र करावा.


6) महागाई- :- लॉकडाउन आणि प्रचंड महागाई  या दोन्हीचा एकाचवेळी सामना लोक करू शकत नाहीत. अर्थव्यवस्था  सुधारण्यासाठी लॉकडाउन शिथिल करून गरिबांना मदत करा


7) लसीकरण - निरर्थक लॉकडाऊनमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी सरकारने लसीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. लॉकडाउन ची अंमलबजावणी साठी कर्मचारी नेमणूक करण्याऐवजी लसीकरण  सुरळीत होण्यासठी  प्रशासनाने अधिक कर्मचारी नियुक्त केले पाहिजेत.


8) वैद्यकीय पायाभूत सुविधा:- वेळेची मर्यादा घालण्याऐवजी आपण अर्थव्यवस्था खुली करुन त्या पैशाचा उपयोग वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करायला हवा.             

9)अर्थव्यवस्था:-  लॉकडाउननंतर व्यवसाय चांगला होता परंतु सरकारने वेळ कमी करुन अर्थव्यवस्थेला ब्रेक लावले. लोकाना झालेला नुकसान भरपाई साठी संधी भेटली होती ती पण गेली. 

कृपया आमच्या सर्व मुद्द्यांचा काळजीपूर्वक विचार करा आणि त्वरित वेळ न घालवता सकाळी ९ते संध्याकाळी ६ किंवा सकाळी १० ते सायंकाळी ७  या वेळेत दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी व त्वरित शनिवार व रविवारचा लॉकडाउन रद्द करावा हि विनंती.

----

. किरण व्होरा,   श्यामराव हरिभाऊ  देडगावंकर

( महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन, अहमदनगर)


 सुभाषसेठ मुथा 

(महाराष्ट्र राज्य  सराफ सुवर्णकार संघटना)

. नीलकंठराव देशमुख

(अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटना)

 सुभाषसेठ कायगावकर, 

(अखिल भारतीय लाड सुवर्णकार संघटना)

प्रत:-

१. मा. उपमुख्य मंत्री, महाराष्ट्र सरकार

२. मा. आरोग्य मंत्री,महाराष्ट्र सरकार

३. मा. पालक मंत्री, अहमदनगर 

४. मा.मदत व पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र सरकार

५. मुख्य सचिव आपत्ती व्यवस्थापन, मुंबई

६. मुख्य सचिव ,महाराष्ट्र सरकार

७. मा . जिल्हाधिकारी, अहमदनगर

८. मा. संग्राम भैय्या जगताप( नगर विधानसभा सदस्य)

९. आपत्ती व्यवस्थापन विभाग, अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post