आ.निलेश लंके यांचे खा.विखे यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर...'त्या' नेत्यांनी माझी धास्ती घेतलीय

 

आ.निलेश लंके यांचे खा.विखे यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर...नगर: जिल्ह्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके व भाजपचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. खा.विखे यांनी केलेल्या टिकेचा आ.लंके यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

काही लोक माझ्यावर टिका करू लागले आहेत. त्यांनीच विमानातून रेमडेसीविर इंजेक्शन आणले, त्यांनीच लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ते इंजेक्शन वाटले कुणाला ? असा सवाल करीत आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे ज्या प्रमाणे तालुक्यातील नेत्यांनी धास्ती घेतली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यांतील नेत्यांनी धास्ती घेतली असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले आहे.


पारनेर तालुक्यातील पळशी येथे विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. लंके बोलत होते. 


आ. लंके म्हणाले, पूर्वी तालुक्यातील पुढाऱ्यांना माझी भिती वाटायची, आता जिल्हयातील पुढाऱ्यांना वाटू लागली आहे. त्यांनीच विमानातून रेमडेसिवीर इंजेक्शन आणली. लोकांना व्हिडीओ दाखविला. परंतू ती इंजेक्शन वाटली कोणाला? असा सवाल त्यांनी केला. खा. विखे यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यावरही आम्ही उपचार करून कोरानातून बरे केले. 

रेमडेसिवीरचा केंद्रबिंदू काढला तर सगळेच अडचणीत येतील. स्वतःला नेते समजणारे तालुक्यातील पुढारी एजंटांच्या मार्फत काळाबाजार करीत होते. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. स्वतःला पुढारी समजणारे ३५ ते ४० हजारांना इंजेक्शन विकत होते.  या पुढाऱ्याने ही इंजेक्शन कुठून आणली, त्याचा वाटा तुम्हालाही मिळाला का असा सवाल आ. लंंके यांनी केला. आम्हीही इंजेक्शन वाटले. जे माझ्याकडे आले  त्यांना मोफत दिली. छापील किमतीमध्ये आणलेली इंजेक्शन त्याच दराने रूग्णांपर्यंत पोहचविण्याचे काम माझ्या कार्यकर्त्यांनी केले असे ते म्हणाले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post