कॉंग्रेसला मोठा धक्का... 'हा' बडा नेता भाजपच्या वाटेवर

 

कॉंग्रेसला मोठा धक्का... कृपाशंकर सिंह भाजपच्या वाटेवरमुंबई: राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह उद्या बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून अडगळीत गेले होते. मात्र, 2019मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात सामील झाले नव्हते. मात्र, त्यांनी या काळात भाजप नेत्यांशी घरोबा निर्माण केला होता. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह यांच्या घरी गणपतीलाही येत होते. यावरून सिंह यांनी भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवल्याचं स्पष्ट होत होतं. त्यामुळेच ते भाजपमध्ये जाणार असल्याचे कयास वर्तवले जात होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post