अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली म्हणून पालिकेत राडा, दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल


अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली म्हणून पालिकेत राडा, दोन नगरसेवकांसह ७ जणांवर गुन्हा दाखल नगर: कोपरगाव येथे नगरपालिकेने अनधिकृत टपऱ्यांवर  कारवाई केल्यानंतर  शहरातील शिवसेनेच्या  एका गटाने थेट पालिकेवर हल्ला  करत बांधकाम विभागाची पूर्णपणे तोडफोड केली व अधिकऱ्यांना धक्काबुक्की करत धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन नगरसेवकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील बस स्थानाकासमोर आलेल्या पूनम थिएटर समोरील अतिक्रमण केलेल्या दोन टपऱ्या प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या आदेशानुसार काढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे  व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ  हे गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. त्यानंतर टपऱ्या टाकणारे व अनेक शिवसेना कार्यकर्ते  घेऊन पालिका कार्यालयातील आले असता बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची व काचा फोडून नुकसान केले.


तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना शिवीगाळ व मारहाण करून मोठमोठ्याने आरडाओरड केली. या प्रकरणी शहर पोलिसांत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना माजी शहर प्रमुख सनी सनी रमेश वाघ, नगरसेवक योगेश तुळशीदास बागुल, उपजिल्हाप्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post