आ.रोहित पवार माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरतात

 आ.रोहित पवार माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरतातनगर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. “रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात,” असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केलाय. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. 

राम शिंदे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय? आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियात पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचे दाखवितात.’ ‘जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही,’ असंही त्यांनी नमूद केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post