केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणतात... पंकजाताई...

आता पंकजाताई माझ्या नेत्या, केंद्रीय मंत्री कराड यांनी केले स्पष्टीकरणनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. . त्यातच पंकजा मुंडे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं. आता केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं ट्विट केलंय. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी या दिल्लीतील भेटीची माहिती दिलीय. 

भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आज (12 जुलै) पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post