नगरमधील 'या' मोठ्या कंपनीत कामगार सेनेचे यश, शिवसेनेने केला जल्लोष

 स्नायडर (एल अ‍ॅण्ड टी) कंपनीत कामगार सेनेने यश संपादन केल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने सन्मान


कामगार सेनेने मिळविलेले यश चांगल्या कामाची पावती - दिलीप सातपुते     नगर -  शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य, महिला, कामगार यांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्‍न सोडविले आहेत. औद्योगिक क्षेत्रात भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांचे संघटन करुन त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे. कंपनी आणि कामगार यांच्यामध्ये समन्वयाची भुमिका कामगार सेनेने घेतली आहे. आज स्नायडर कंपनीत कामागार सेनेने मिळविलेले यश हे पदाधिकार्‍यांच्या कामाची पावती आहे. नूतन पदाधिकार्‍यांनी कामगारांच्या अडचणी समाजावून घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करावे. कंपनी ही आपली आहे या दृष्टीकोनातून काम करावे. आपल्या पाठिशी पक्ष राहील, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.

     शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या परिवर्तन पॅनेलने स्नायडर (एल अ‍ॅण्ड टी) घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, नगरसेवक गणेश कवडे, उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, मधुकर निकम, कृष्णा गोंडाळ, ज्ञानेश्‍वर बोडखे, अनिल बेरड, विठ्ठल कोतकर, उमेश पाटोळे, धनंजय तांदळे, संदिप पाटील, जी.बी.गुंजाळ आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी विक्रम राठोड यांनीही मिळविलेल्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन कामगारांच्या पाठिशी शिवसेना कायम राहील. चांगले काम करुन कंपनी आणि संघटनेचा लौकीक वाढवावा, असे आवाहन केले.

     यावेळी मधुकर निकम म्हणाले, शिवसेना पदाधिकारी व कामगार सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार काम करत आहेत. चांगले काम करत असल्याने पुन्हा कामगार सेनेवर विश्‍वास दाखविला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी यापुढेही आम्ही कार्यरत राहू. कामगार सेनेचे काम वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

     यावेळी कैलास खोकराळे, सचिन कुसळकर, सुभाष दराडे आदिंसह कामगार उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post