लाच प्रकरणात कनिष्ठ लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात


लाच प्रकरणात कनिष्ठ लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात जळगाव- सेवानिवृत्तीची रक्कम अदा केल्याच्या बदल्यात अडीच हजाराची लाच मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे वडील रावेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या ग्रॅज्यूएटीची रक्कम ३ लाख ९१ हजार ७१० रूपये बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज ( वय ३०) रा. मदिन कॉलनी रावेर याने २ हजार रूपये आणि अर्जीत रजेची येणारी रक्कत बँक खात्यात जमा करण्यासाठी ५०० असे एकुण अडीच हजार रूपयाची लाचेची मागणी केली. ही मागणी संशयित आरोपीने पंचासमोर केली. आरोपी कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post