माझ्या आई-बहिणींनो मी सदैव आपल्या सोबतच : आ. रोहित पवार

 *तुमचा भाऊ म्हणुन मी सदैव तुमच्या पाठीशी -आ.रोहित पवार*

_कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आ.रोहित पवारांचा 'शिवण यंत्र' व 'गिरणी यंत्र' देऊन 'आधार'_

( प्रतिनिधी - नासीर पठाण ) -________________________________जामखेड दि/२३

           'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे.हे दुःख आपल्या सर्वांसाठीच खुप मोठे आहे मात्र या दुःखातून सावरणे गरजेचे आहे. मुलांचे शिक्षण,त्यांचे भवितव्य,घरातील मंडळींचे आजारपण आदी बाबी सांभाळताना मोठ्या जबाबदाऱ्याही सांभाळायच्या आहेत.लोकप्रतिनी म्हणुन मी माझीही जबाबदारी असल्याचे समजतो.या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना थोडासा हातभार लागावा म्हणुन स्वयंरोजगारासाठी ही छोटीशी मदत होईल' असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.

         जामखेड तालुक्यातील नान्नज येथे कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांसाठी घेण्यात आलेल्या 'आधार' या कार्यक्रमात ते बोलत होते.आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील निराधार महिलांना २१ शिवण यंत्र व ३३ पिठ गिरणी यंत्र देण्यात आले. कर्जत तालुक्यातीलही निराधार महिलांना आ. रोहित पवारांनी शिवण यंत्र व पीठ गिरणी यंत्र देऊन आधार दिला आहे.कोरोना महामारीने अनेक कुटूंबातील कर्त्या पुरुषांवर काळाने घाला घातला. त्यामुळे अनेक जबाबदऱ्यांचे ओझे महिलांच्या खांद्यावर येऊन पडले. या कुटुंबांना आधार देण्यासाठी आ. रोहित पवार तसेच त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार या परिश्रम घेत आहेत.या कुटुंबाच्या प्रत्यक्ष भेटी घेत सुनंदा पवार यांनी त्यांना धीर देण्याचे काम केले. कोणत्याही परिस्थितीत न खचता, न डगमगता आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.ज्या कुटुंबावर हे संकट आले त्या कुटुंबांना आपली उपजीविका भागवता यावी म्हणुन आ. रोहित पवारांनी केलेला हा प्रयत्न निराधार कुटुंबांचे अश्रू पुसणारा आहे.

       'आधार' कार्यक्रमासाठी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गट विकासाधिकारी परशुराम कोकणी,तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


*माझ्या आई-बहिणींनो मी सदैव आपल्या सोबतच : आ. रोहित पवार!*

        आपले प्रियजन आपल्या सोबत नसणे हे जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे.मात्र संसाराचा गाडा हाकण्यासाठी आता थांबून चालणार नाही. कुटुंब पुन्हा उभा करावे लागणार आहे. जिथे गरज असेल तिथे मला आवाज द्या.भविष्यात कोणतीही अडचन असल्यास तुमचा भाऊ म्हणून मी सदैव आपल्या सोबतच असेल. असेही आ . रोहित पवार म्हणाले .

प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post