शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव व साथीदारांवर खंडणीचा गुन्हा

 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव व साथीदारांवर खंडणीचा गुन्हानगर: दिल्लीगेट येथे बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्या मागे पाच हजार याप्रमाणे 12 गळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत एकास खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचा नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधवसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय रमेश सामलेटी (रा. तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे.


गुन्हा दाखल झाल्यामध्ये जाधवसह त्याचा भाऊ राजेश जाधव, बाळासाहेब जाधव, चेतन जाधव, भागीरथ बोडखे, प्रतिक बोडखे यांचा समावेश आहे. 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांंनी दिलेली माहिती अशी की, विजय सामलेटी यांच्यासह श्रीपाद छिंदम व त्यांच्या ओळखीचे इतर लोक दिल्लीगेट येथे सामलेटी यांना गाळा भाड्याने घ्यायचा असल्याने तो गाळा पाहण्यासाठी गेले होते. गाळ्याची देखरेख करत असताना गिरीश जाधवसह त्याचे इतर भाऊ व साथीदार त्याठिकाणी आले.

यावेळी ते श्रीपाद छिंदम याला म्हणाले, हे गाळे तुम्ही येथे कसे उभे केले, तु मला विचारल्याशिवाय मिळकतीत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायचे नाही. तुला काही बांधकाम करायचे असल्यास प्रत्येक गाळ्यामागे पाच हजार याप्रमाणे 12 गाळ्याचे 60 हजार रूपये हप्ता द्यावा लागेल. माझ्यावतीने आमचा कोणीही माणूस येईल आणि हप्ता घेऊन जाईल. त्याची पुर्तता अगोदरच करून ठेवायची, असा दम दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post