नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरण...महिलेसह तिच्या साथीदाराला अटक


नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरण...महिलेसह तिच्या साथीदाराला अटक नगर : तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे हनीट्रॅप चालविणारी महिला आणि तिला मदत करणारा आरोपी गणेश गिर्‍हे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली. आरोपी राहाता तालुक्यातील लोणी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. 


पाथर्डी तालुक्यातील 42 वर्षीय इसमाला पेंटींगचे मोठे काम देते असे सांगून नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील हनीट्रॅप चालविणार्‍या महिलेने तिच्या घरी बोलावून घेतले होते. मोठे काम मिळणार असल्याने ते संबंधित महिलेच्या घरी गेले असता तिने जवळीक साधत त्यांच्यासोबत काही फोटो काढले होते. तसेच नवर्‍याने आपल्याला रंगेहाथ पकडले असल्याचे भासवून फिर्यादी यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. 

 फिर्यादीवरून वडगाव गुप्ता येथे हनीट्रॅप चालविणाऱ्या महिलेसह आरोपी किरण खर्डे आणि पाथर्डी तालुक्यातील राघेहिवरे येथील गणेश छगन गिर्‍हे या तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आरोपी किरण खर्डे मात्र फरार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post