राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला अपघात...


शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला अपघात... थोडक्यात बचावल्या हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज (शनिवार 10 जुलै) थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. त्यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनाची स्पीड वाढवल्याने अपघात टळला. मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे.

शनिवारी वर्षा गायकवाड ह्या हिंगोली शासकीय रुग्णालयातून ऑक्सिजन प्लांन्टचे उद्घाटन आटोपून शहरातील रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या असताना पीपल्स बँकेजवळ मोंढ्यातून येणाऱ्या पीक अप टेम्पो भरधाव येत वर्षा गायकवाड यांच्या कारवर धडकला. मात्र, त्यांच्या वाहनचालकाने कारचा स्पीड वाढवली. त्यामुळे हा टेम्पो कारच्या मागील बाजूस घासला गेला. सुदैवाने यात वर्षा गायकवाड यांना कुठलीही इजा झाली नाही. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post