नगर तालुका पोलिसांची छापेमारी, हातभट्ट्या उद्ध्वस्त, ८ जणांवर गुन्हे दाखल

 

नगर तालुका पोलिसांची छापेमारी, हातभट्ट्या उद्ध्वस्त, ८ जणांवर गुन्हे दाखल नगर : नगर तालुका पोलिसांनी तालुक्यातील वाळकी, साकत, खडकी, निमगाव वाघा, नेप्ती या ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापेमारी केली. सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ठिकठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या असून कच्चे रसायन, तयार हातभट्टी दारू असा सुमारे तीन लाख रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याप्रकरणी एकुण आठ जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नगर तालुक्यातील हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहे.

वाळकी येथील संतोष दिलीप पवार याच्या हातभट्टीवर छापा टाकून दारू व कच्चे रसायन नष्ट केले. पोलीस शिपाई विक्रांत भालसिंग यांच्या फिर्यादीवरून पवार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. साकत येथील सीनानदी शिवारात चार ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर छापेमारी करत एक लाख 32 हजार रूपये किंमतीचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केेले.

याप्रकरणी दत्तु महिपती पवार, सोमनाथ नारायण पवार, राजु मौला पवार, अर्जुन मौला पवार (सर्व रा. साकत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी शिवारातही पोलिसांनी एका हातभट्टीवर छापा टाकला. तसेच निमगाव वाघा येथील पवार वस्ती येथील गावठी दारू अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी सचिन नाथा पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेप्ती शिवारातही दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सुभाष रघुनाथ मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी एकाचवेळी अनेक हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई केल्याने हातभट्टी चालक, दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. ही कारवाई सहायक निरीक्षक सानप यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी गांगर्डे, सोनवणे, कदम, शिंदे, लगड, भालसिंग यांच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post