'या' कामासाठी ग्रामसेविकेचे मंत्री बच्चु कडू यांनी केले कौतुक


ग्रामसेविका प्रियंका भोर यांचे मंत्री बच्चु कडू यांनी केले कौतुक
 नगर : नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे एकलव्य समाजासाठी राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची दखल घेत राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी ग्रामसेविका प्रियंका विठ्ठल भोर यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी भोर यांना अभिनंदनाचे प्रोत्साहनपर पत्र पाठविले आहे.

आदिवासी भिल्ल समाजाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या शबरी आवास योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेचा योग्य समन्वय साधला. त्यातून कर्जुने खारे येथे शबरीनगर गृहसंकुल योजना राबविण्यात आली. या योजनेत तब्बल 60 कुटुंबाना पक्क्या घरकुलांचा लाभ मिळाला आहे. ही योजना पहिल्यांदाच इतक्या प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post