११ वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर

११ वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची तारीख जाहीर मुंबई : 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता 11 वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे 10वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 19 जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post