मतासाठी कोण गुहेत जाऊन बसले होते हे देशाने पाहिले आहे, राजेंद्र फाळके यांचे बेरड यांना प्रत्युत्तर

 

मतासाठी कोण गुहेत जाऊन बसले होते हे देशाने पाहिले आहे, राजेंद्र फाळके यांचे बेरड यांना प्रत्युत्तरनगर: जनता पावसात भिजत असताना आपण एकट्याने डोक्यावर छत्री धरायची नसते.तसेच देश महामारीत ग्रस्त असताना आपण बिळात लपून बसायचे नसते, हे बहुतेक भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बेरड सरांना माहिती नसावे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले आहे. प्रा.बेरड यांनी सोशल मीडियावर मोदी व पवारांचा फोटो टाकून पावसातील पवारांच्या सभेवरून टोला लगावला होता. त्याला जोरदार उत्तर देताना फाळके म्हणाले की, मतासाठी कोण गुहेत जाऊन बसले होते हे देशाने पाहिले आहे.पाऊस तर अचानक येत असतो.त्यावेळेस सर्वांना भिजत ठेऊन फक्त आपल्या डोक्यावर छत्री धरणारा हा मतलबी असतो. व जो लोकांच्या बरोबर भिजतो तो लोक नेता असतो. देशातील कसल्याही आपत्तीच्या काळात शरद पवार साहेब यांनी खंबीरपणे काम केलं आहे. किल्लारी असो की गुजरात मधील भूकंप, पूर परिस्थिती असो की बॉम्बस्फोट अशा वेळी भाषणबाजी न करता रस्त्यावर उतरून काम केलं आहे. बेरड सर थोडा अभ्यास वाढवला तर बरे होईल. 

केंद्रातील भित्र्या सरकारने आपल्या अस्तित्वाला, राजकारणाला सुरुंग लागू नये म्हणून देशातील महत्वाचे नेते, न्यायाधीश, पत्रकार, रणनीतीकार यांची फोन हॅक करून माहिती चोरली यावरून लक्षात येते की सत्तापिपासू कोण आहे!


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post