पंकजा मुंडे यांच्या 'त्या' वक्तव्यावर फडणवीस म्हणाले....

 

गोपीनाथ मुंडेंमुळेच मी घडलो... देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रियापुणे: दिवंगत गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांनीच आम्हाला घडवलं. मी आणि भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते आहोत, असं सांगतानाच पंकजा मुंडे यांनी आज जी भूमिका मांडली तीच भाजपची भूमिका आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 


देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. पुण्यात त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांनी मांडलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, असं फडणवीस म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post