भाळवणी परिसरात 'एक्साईज'ची मोठी कारवाई, विदेशी दारूसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


भाळवणी परिसरात 'एक्साईज'ची मोठी कारवाई, विदेशी दारूसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्तनगर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर व पुणे पथकाने  संयुक्त कारवाई करत तीन वाहनातून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा विदेशी मद्यसाठा जप्त  केला आहे. नगर- कल्याण महामार्गावर  पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात पथकाने ही कारवाई केली. विदेशी मद्यसाठा, तीन वाहनांसह सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक राधु गुंड (वय 39 रा. वडगाव गुप्ता ता. नगर), प्रकाश बाबाजी शेळके (वय 34 रा. निघोज ता. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक  करण्यात आली आहे. मद्यसाठा वाहतूक करणारा मुख्य सुत्रधार राजु ऊर्फ राजेंद्र शिंदे हा पसार झाला आहे.


नगर-कल्याण महामार्गावरून अवैधरित्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक केली जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला लागली होती. त्यानुसार पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार एक सहाचाकी ट्रक (एमएच 14 एएस 9531), एक स्विफ्ट कार (एमएच 16 एमआर 9631) व कार (एमएच 4 ईडी 3585) पथकाने आडवून त्याची तपासणी केली. यावेळी विदेशी मद्यसाठा मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली. ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश इंगळे, उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक दिगंबर शेवाळे, निरीक्षक ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक वर्षा घोडे, विजय सुर्यवंशी, महिपाल धोका, गोपाळ चांदेकर, एस. व्ही. बोधे, एस. आर. गायकवाड यांच्या पथकाने केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post