अटकेची टांगती तलवार...माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'नॉट रिचेबल'

अटकेची टांगती तलवार...माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'नॉट रिचेबल'मुंबई:  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर सीबीआय व ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या 'नॉट रिचेबल' आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीनं ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्यानंतर देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटकेच्या भीतीनं ते गायब झाल्याचं समजतं. 

'टाइम्स ऑफ इंडिया'नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. 'ईडी'नं मनी लॉंडरिंग प्रकरणी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवासस्थानावर छापे घातले. देशमुख यांचा स्वीय सहाय्यक व स्वीय सचिवालाही अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ईडीनं पुढील कारवाई करत देशमुख यांची ४.२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post