१५ कोटींची खंडणी, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल

 

१५ कोटींची खंडणी, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखलमुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यापासून परमबीर सिंह सातत्याने चर्चेत आहेत. उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गंभीर आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. तेव्हापासून सिंह सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत. दरम्यान, आता सिंह यांच्याही अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहेे

आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप या व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे.

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post