नवीन शासकीय वाहने खरेदी इलेक्ट्रिक वाहनांचीच असणार

 

नवीन शासकीय वाहने खरेदी इलेक्ट्रिक वाहनांचीच असणारमुंबई: बृहन्मुंबई, पुणे, नागपूरसह सहा प्रमुख शहरांमध्ये 1 एप्रिल 2022 पासून शासकीय, निमशासकीय, महापालिका किंवा सरकारच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी व भाडेतत्वावरील वाहने बॅटरीवरील इलेक्ट्रीक वाहने (इव्ही) असावी, असे बंधन सुधारित ‘महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरणा’त घालण्यात आले आहे. तर खासगी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्मिती, वाहन-बॅटरी खरेदी-विक्री, नोंदणी, मोडीत काढणे अशा विविध टप्प्यांवर सवलती देण्यात येणार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांकरिता 930 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इलेक्ट्रीक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासंदर्भात सूतोवाच केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post