फक्त २९९९ रूपयांत बुकींग, प्रती कि.मी. फक्त १० पैसे खर्च असलेल्या इलेक्ट्रिक सायकल्स

फक्त २९९९ रूपयांत इलेक्ट्रिक सायकल, बुकींग नंतर थेट होम डिलिव्हरीमुंबई:  देशात  सतत वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय ठरत आहेत.  नाहक मोटर्स या भारतीय कंपनीने अलिकडेच आपल्या पॉवरफुल इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या होत्या. आता कंपनीने गरूडा आणि जिप्पी या दोन्ही दमदार इलेक्ट्रिक सायकल्ससाठी बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. गरूड आणि झिप्पी या दोन्ही पूर्णतः मेड इन इंडिया सायकल आहेत. कंपनी विविध टप्प्यात या दोन्ही सायकलसाठी बुकिंग स्वीकारेल. बुकिंगचा पहिला टप्पा २ जुलै ते ११ जुलै या दरम्यान सुरू झाला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन २,९९९ रुपयांमध्ये या सायकल्ससाठी बुकिंग करता येईल. बूक केलेल्या इलेक्ट्रिक सायकल १३ जुलैपर्यंत डिस्पॅच केल्या जातील आणि १५ ऑगस्टपर्यंच ग्राहकांना सायकल्सची होम डिलिव्हरी मिळेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली. 

नाहक मोटर्स (Nahak Motors) ने झिप्पी  आणि गरूड (Garuda) या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल्समध्ये एडव्हान्स फीचर्स आणि टेकनिकचा वापर केला आहे. या इलेक्ट्रिक सायकल्समध्ये ग्राहकांना रिमुवेबल बॅटरी, एलसीडी डिस्प्ले आणि पॅडल सेन्सर टेक्नॉलॉजी असे लेटेस्ट फीचर्स मिळतील. ग्राहकांना या इलेक्ट्रिक सायकल्स चालवण्यासाठी एका किलोमीटरमागे फक्त १० पैसे खर्च येईल असा कंपनीचा दावा आहे.

या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलमध्ये यामध्ये स्वॅपेबल बॅटरी दिली आहे. ही लिथियम-आयन बॅटरी असून ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारण ३ तासांचा वेळ लागतो. घरातल्या सामान्य चार्जिंग सॉकेटद्वारेही दोन्ही इलेक्ट्रिक सायकलची बॅटरी चार्ज करता येते. शिवाय बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल सुमारे ४० किलोमीटर पर्यंत अंतर कापू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post