डॉ.शेळके आत्महत्या, तालुका वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे चौकशीचे आदेश

डॉ.शेळके आत्महत्या, तालुका वैद्यकीय अधिकारी सक्तीच्या रजेवर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे चौकशीचे आदेशनगर:  शिर्डी देवस्थानवर  विश्‍वस्त नियुक्त करतांना त्यांना कोणत्याही क्षेत्रातील दहा वर्षाचा अनुभव असावा असे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. दहा ऐवजी पाच वर्षांचा अनुभव असावा असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरु असुन 31 जुर्लपर्यंत विश्‍वस्त मंडळ नियुक्त करण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.


दरम्यान, करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील  डॉ. गणेश शेळके आत्महत्या प्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांची चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर आढावा बैठक घेण्यासाठी पालकमंत्री नगरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post