ड्रॅगनफ्रुट शेती करा व शासकीय अनुदान मिळवा.... शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

 ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन



अहमदनगर: जिल्ह्यातील ड्रॅगनफ्रूट लागवडीचे क्षेत्र वाढत असून सन 2021-22 या वर्षापासुन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियनातुन ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहेत. ड्रॅगनफ्रुट लागवडीसाठी अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टल (mahadbtmahait.gov.in) वर फलोत्पादन या घटकांखाली अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


ड्रॅगनफ्रुट (कमलम) हे एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्वपुर्ण फळ आहे. ड्रॅगनफ्रुट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्व आणि ॲन्टीऑक्सीडन्टमुळे या फळास सुपर फ्रुट म्हणून प्रसिध्दी मिळत आहे. तसेच या फळात विविध औषधी गुण आहेत. या व्यतिरिक्त या फळामध्ये फॉस्फरस  व कॅल्शीयम या सारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. तसेच या पिकाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पिक संरक्षणावर जास्ती खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. या फळाचे क्षेत्र, मागणी, निर्यातक्षमता, औषधी व पोषक मुल्य इ. बाबी लक्षात घेऊन ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पुर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मी. बाय 3 मी. 3 मी बाय 2.5 मी. या अंतरावर खड्डे खोदून खड्याच्या मधेमध सिमेंट काँक्रीटचा किमान 6 फुट उंचीचा खांब  व त्यावर काँक्रीटची फ्रेम बसविण्यात यावी. सदर सिमेट कॉक्रीट खांबाच्या एक बाजुला एक या प्रमाणे चार बाजुला चार रोपे लावावीत.

ड्रॅगनफ्रुट फळपिकाची लागवड करण्यासाठी लागवड साहीत्य आधार पध्दत, ठिबक सिंचन, खते व पिक संरक्षण या बाबीकरीता अनुदान देय आहे. याकरिता रक्कम रु. 4 लाख प्रकल्पमुल्य ग्राह्य धरुन 40 टक्के प्रमाणे रक्कम रुपये 1 .60 लाख अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देय आहे. दुस-या वर्षी 75 टक्के  व तीस-या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील, असे कृषी विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट करण्यात आले आहे.***

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post