दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधनबॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जात होतं. हिंदी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच देण्यात येतं. तसेच त्यांना ट्रॅजिडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले. 1944 साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post