जमिनीचा वाद...सख्खा भाऊ झाला वैरी....एकाचा खून

 जमिनीचा वाद...सख्खा भाऊ झाला वैरी....एकाचा खूननगर:  श्रीगोंदा  तालुक्यातील देवदैठण येथे जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला. शनिवारी रात्री झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मृताच्या सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. पाडूरंग जयवंत पवार (वय 52, रा. पिंपळनेर, ता. पारनेर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग पवार यांचा शंकर पवार या सख्ख्या भावाशी जमिनीचा वाद होता.

शनिवारी सकाळी पाडूरंग पवार हे दत्तात्रय भाऊसाहेब लटांबळे, शिवदास श्रीधर रासकर, शंकर काशिनाथ जकटे (रा. पिंपळनेर) या मित्रांबरोबर सायंकाळी सूपा येथील हॉटेलवर मद्यपान केले. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील पाहुण्यांकडे आले. माघारी जाताना ढवळगाव येथील हॉटेलमध्ये पुन्हा मद्यपान केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरी जाताना देवदैठण येथील एरिगेशन कॉलनीसमोर तिघांनी पवार यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे रविवारी सकाळी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, नाईक संतोष गोमसाळे, डी. आर पठारे, चालक शिंदे यांच्या टीमने तपास केला. त्यानंतर पिंपळनेरहून वरील तीन जणाना ताब्यात घेतले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात सागर पांडुरंग पवार (वय 25) यांनी फिर्यादी दिली. त्यात शंकर जयवंत पवार (मयताचा भाऊ) देखील सामील असल्याचा आरोप केला असून तो पसार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post