डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलं


डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठं नुकसान टळलंं मुंबई: नगर  जिल्ह्यातील  शेतकऱ्याला नालासोपारामधील आरोपीने फसवल्याचा प्रकार घडला आहे. प्रकाश चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. शेतमाल मुंबईला बोलावून घेत शेतकऱ्याला गंडवले. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव फसला.

या आरोपीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील शेतकरी अमोल कोहे यांच्याकडून डाळिंबाच्या गाडीची मागणी केली. कोहे यांनी आरोपीला डाळिंबाचे छायाचित्रेदेखील पाठवले. १४ जुलै रोजी अहमदनगरमधून 12 कॅरेट डाळिंब असे एकूण 87 हजार 800 रूपयांचा माल नालासोपारामध्ये आणला गेला. आरोपी प्रकाश चौधरी याने भाड्याच्या गाडीमध्ये डाळिंबचे सर्व कॅरेट भरले. पैसे घेऊन येतो असे सांगून तेथून निघून गेला.

आपली फसवणूक झाली लक्षात येताच कोहे यांनी नालासोपारा तुलिंज पोलिसांत या विषयी तक्रार केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या मदतीने यंत्रणा कामाला लावली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतले असता त्यांना आरोपी घरीच असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता, तो घरीच असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपी चौधरीला बेड्या ठोकण्याआधी चोरी झालेला डाळिंबाचा माल हा शोधून काढला. या डाळिंबाचा माल मिळण्यास उशिर झाला असता तर तर तो पूर्णतः खराब झाला असता. परिणामी शेतकरी कोहे यांचे मोठे नुकसान झाले असते. परंतु पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होता होता वाचले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post