मोठी बातमी... चंद्रकांत पाटील म्हणतात... राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका‌, कार्यकर्त्यांनी कामाला लागा..

 

राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका‌, कामाला लागा..

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्त्यांना आवाहन


अहमदनगर:  येथे भाजपा  समर्थ बुथ अभियान अहमदनगर दक्षिण ची  बैठक प्रेमराज सारडा कॉलेज सभागृहात दिनांक 23 जुलै रोजी  पार पडली.या बैठकीस भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व माजी मंत्री प्रा राम शिंदे,दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्री. अरुण मुंढे , रवि अनासपुरे, प्रा. भानुदास बेरड,  आ.मोनिकाताई राजळे , मा.आ.शिवाजीराव कर्डीले, लक्ष्मण सावजी,    युवा मोर्चा अध्यक्ष सत्यजित कदम , बाळासाहेब_महाडीक दिलीप भालसिंग, प्रसाद   ढोकरीकर,युवराज पोटे  व  उपाध्यक्ष , चिटणीस , सरचिटणीस , मंडल अध्यक्ष बूथ संयोजक व  सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

 यावेळी प्रदेश अध्यक्ष . चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या अनागोंदी कार्यपद्धतीमुळे जनता त्रस्त झाली असून कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात त्यामुळे भाजपा स्वतंत्र निवडणुकीसाठी व सक्षम होण्यासाठी प्रत्येक बुथ ची बांधणी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयार होऊन   कामाला लागावे असे आदेश दिले.


यावेळी मा.श्री.बाळासाहेब महाडिक यांनी आभार मानले.         

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post