विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांची मोर्चेबांधणी...

 

विखेंच्या बालेकिल्ल्यात थोरातांची मोर्चेबांधणी, शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेसची तयारीनगर: सध्या तरुणांचा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट येणार आहे. आगामी काळात शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


शिर्डीत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, लताताई डांगे, श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, स्वराज त्रिभुवन, अमृत गायके, सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मदन मोकाटे, समीर शेख आदी पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


शिर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची  पुन्हा एकदा नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरु झाली. पुष्पक रिसोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात कॉ्ंग्रेस पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post