कॉंग्रेसची मोठी घोषणा... महाविकास आघाडीबरोबर निवडणुका लढवणार नाही

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावरच, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा नवी दिल्ली: काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट स्वबळाची भाषा केल्याने काँग्रेस निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post